About

हेल्प्स एज्युकेशन बाचणी

शिक्षण म्हणजे केवळ परीक्षेत गुण मिळवणे नाही; शिक्षण म्हणजे जीवन जगण्याची क्षमता विकसित करणे. आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात माहिती सहज उपलब्ध आहे, परंतु त्या माहितीचे ज्ञानात, ज्ञानाचे कौशल्यात आणि कौशल्याचे संधींमध्ये रूपांतर करणे हेच खरे शिक्षण आहे.याच विचारातून HELPS EDUCATION ची स्थापना झाली.

शिक्षणाचा उद्देश केवळ नोकरी मिळवणे नाही; तर व्यक्तीला सक्षम, स्वावलंबी, मूल्यनिष्ठ आणि समाजासाठी उपयुक्त बनवणे हा आहे.”

HEPAS (HELPS Education Personality Assessment System), Business Education, Parent Guidance, Teacher Development आणि School Partnership या उपक्रमांद्वारे आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमता ओळखून त्याच्या सर्वांगीण विकासाला दिशा देऊ इच्छितो.

चला, एकत्र येऊन शिक्षणातून समृद्ध भविष्य घडवूया.

आमची सुरवात

हेल्प्स बिझनेस क्लब

२०२५ पासून

बदलत्या जगासाठी बदलते शिक्षण

आमचा हेतू

कौशल्याधारित आणि अनुभवाधारित शिक्षण.

करिअरची तयारी, व्यक्तिमत्त्व विकास आणि नेतृत्व.

आर्थिक साक्षरता, उद्योजकता आणि व्यवसायिक विचारसरणी.

आम्ही शाळांची जागा घेण्यासाठी नाही, तर शाळांना अधिक सक्षम करण्यासाठी आहोत.
HELPS EDUCATION  शाळा, शाळा व्यवस्थापन, समुपदेशक, शैक्षणिक साहित्य(TLM) निर्मिती व वितरक, संगणक व सॉफ्टवेअर वितरक, विविध खेळांचे कोच, CSR सल्लागार इत्यादी भागीदारांसोबत कार्य करेल.
HELPS EDUCATION ला स्थानिक (कोल्हापूर)उपक्रमापासून महाराष्ट्रातील अग्रगण्य व्यवसाय शिक्षण परिसंस्था म्हणून विकसित करणे हे आमचे स्वप्न आहे.आपला  विश्वास, सहकार्य आणि सहभागामुळेच हे स्वप्न साकार होईल.
चला, एकत्र येऊन शिक्षणातून समृद्ध भविष्य घडवूया.

 श्री.रंगराव व्ही. पाटील.
·         संस्थापक, हेल्प्स एज्युकेशन
·        सेवनिवृत्त शिक्षक (व्यावसायिक शिक्षण).
·        SCF (SE) 2024 तज्ञ सदस्य.
·        अभ्यासक्रम विकसन तज्ञ सदस्य.
·        NCERT पुस्तक पुनरावलोकन (कौशल्य विकास).
·        व्यावसायिक शिक्षण सल्ला व मार्गदर्शन.
         जिल्हा समन्वयक , शिक्षण कट्टा कोल्हापूर.